औरंगाबादेत आत्तापर्यंत म्युकरमायकोसिसचे १०० बळी, प्रशासन सतर्क!

औरंगाबाद : म्युकरमायकोसिसमुळे शहरात मृत्यूचे आकडे वाढतच आहेत. मंगळवारी (दि.८) आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसात या आजाराने मृत्यू झालेल्याचा १०० शंभरवर गेला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना आता औरंगाबाद शहरावर म्युकरमायकोसिस या आजाराचे संकट ओढावले आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत हा आजार दिसून येत आहे.

म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाबाधित व इतरांना हा आजार होत असून शहर, जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर ठिकाणाहून रुग्ण उपचारासाठी शहरात येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या आजाराने आत्तापर्यंत शंभर जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान मंगळवारी घाटी रुग्णालयात आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच नव्या १५ रुग्णांची भर पडली आहे. आत्तापर्यंत दाखल झालेल्या ९१० रुग्णांपैकी ५१० जणांची रुग्णालयातून उपचारानंतर सुटी झाली आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांत व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनच्या बाटल्यांमध्ये डिस्टील वॉटर ऐवजी साधे पाणी वापरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच कोरोना रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत रुग्णालयांनी तातडीने व्हेंटिलेटर व ऑक्सिजनच्या बाटल्या स्वच्छ करुन त्यामध्ये डिस्टील वॉटरच वापरावे, अशी स्पष्ट ताकीद खासगी व सरकारी रुग्णालयांना पत्राद्वारे दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP