मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी दोन वर्षात केलेले १०० घोटाळे उघड केले आहेत. यात शिवसेनेच्या आठ मोठ्या नेत्यांसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचा समावेश आहे. आज पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी याविषयी माहिती दिली.
किरीट सोमय्या म्हणाले, शिवसेनेचे नेते अनंदराव अडसुळ, प्रताप सरनाईक यांची ७८ एकर जागा ईडीने जप्त केली आहे. संजय राऊत यांनी ५५ लाख परत केले आहेत, अनिल परब यांची चौकशी सुरु आहे, आणि आणखी दोन शिवसेना नेत्यांच्या मी तक्रारी केल्या आहेत. त्याचाही तपास सुरु आहे.
उध्दव ठाकरे सरकारमधील आठ मोठे नेते ईडीच्या रडारवर आहेत. यांच्यावर लवकरच कारवाई केली जाणार आहे. आमरावतीचा जो माझा दौरा तहकूब झाला होता तो मी ३० नोव्हेंबर रोजी आयोजीत केला आहे. आमरावती शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांनी जो सीटी बँक घोटाळा केला या दौऱ्यांत तो मी उघड करणार आहे.
जालना सहकारी साखर कारखाना चे शेतकरी आज मला मुंबई येथे भेटले, मला जालना येण्यासाठी आग्रह केला आहे.
शिवसेना नेता अर्जुन खोतकर घोतळाचा पाठपुरावा आणि शेतकऱ्यांना न्याय साठी
मी १ डिसेंबर रोजी जालना साखर कारखाना आणि जालना APMC ए पी एम सी घोटाळ्याची पाहणी करणार. @Dev_Fadnavis pic.twitter.com/AlP5MnhJQj
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 27, 2021
२४ महिन्यांतील मविआचे १०० घोटाळे
महाविकास आघाडीच्या सहा मोठ्या मंत्र्यांना अटक झाली आहे. २४ हून अधिक घोटाळ्यांची चौकशी सुरु आहे. त्यात अजित पवार यांचा विशेष उल्लेख करतो. उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचा घोटाळा मागच्या वर्षी याच दिवशी मी उघडकीस आणला होता. याबाबत ठाकरे सरकारने माफी मागीतली आहे. अजित पवार पुढच्या महिनाभरात १ हजार ५५ कोटींच्या माहितीसह आणखी संपत्तीची माहिती समोर येत आहे.
कोल्हापुरला जाताना पोलिसांनी माझी गैर पद्धतीने अडवणूक केली होती. त्याची १५ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मिलींद नार्वेकर यांचा आणखी एक बंगला अनधिकृत आहे. अशी माहिती मला कुणीतरी पाठवली आहे. अनिल परब यांच्या प्रकरणावर काल सुनावणी झाली. त्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यांनी काही दिवसांची मुदत मागितली आहे. असेही किरीट सोमय्या म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- मलिकांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करत म्हणाले,’या गाडीत बसलेले…’
- प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही- धनंजय मुंडे
- अशा प्रसंगी परमेश्वर व सरकार तरी काय करणार?- संजय राऊत
- ‘…याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात’, भाजपवर राऊतांची टोलेबाजी
- महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी राज्य पेटवायचा डाव- यशोमती ठाकूर