fbpx

राजकीय भूकंपाची शक्यता; ‘१०० आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत’

bjp flag

कोलकाता : एका बाजूला देशभरात लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना दुसऱ्या बाजूला तृणमूल कॉंग्रेसच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे. तृणमूल काँग्रेसचे १०० आमदार आपल्या संपर्कात असून ते कधीही भाजपमध्ये सामील होतील, असा दावा भाजप नेते अर्जुन सिंह यांनी करून खळबळ उडवून दिली आहे.

अर्जुन सिंह यांच्या बोलण्यामध्ये किती तथ्य आहे येत्या काही काळात स्पष्ट होईल .दरम्यान,काही आमदार निवडणुकीपूर्वी आणि काही निवडणुकीनंतर भाजपमध्ये सामील होणार असल्याचे अर्जुन सिंह यांनी ठासून सांगितले आहे.

कोण आहेत अर्जुन सिंह?

आपल्या विविध वादग्रस्त विधानांसाठी अर्जुन सिंह यांना ओळखले जाते. सिंह यांनी तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पश्चिम बंगालच्या भाटपुरी मतदार संघातून आमदार राहिलेले अर्जुन सिंह यांचे उत्तर कोलकातापासून नादिया भागात वर्चस्व आहे.