१०० लाख कोटींच्या ‘गतीशक्ती’ योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी आज “गती शक्ती योजनेचा” आरंभ केला. या योजनेमध्ये अर्थ, रस्ते , रेल्वेसहित विविध १६ मंत्रालयाला जोडण्याचे पंतप्रधानांचे उदिष्ट आहे. नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपच्या अंतर्गत हे सर्व विभाग एकमेकांच्या कामांमध्ये सहकार्य पुरवणार आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकारने १०० लाख कोटी रुपयाची तरतूद जाहीर करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या योजनेद्वारे, मल्टी मोडेल कनेक्टिविटीच्या राष्ट्रीय प्लानचे उद्घाटन केले गेले. याच दरम्यान प्रगती मैदानातील नव्या प्रदर्शनाचेही उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. त्यासोबतच भारतीय व्यापार संघटनेचा उपक्रम असलेला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाचे आयोजन सुद्धा १४ ते २१ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात येणार आहे. या प्लानची निर्मिती माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ स्पेस अँप्लिकेशन आणि जिओ इन्फॉर्मटिकसने मल्टी मोडल कनेक्टिविटी यांनी याचा आराखडा तयार केला आहे.

सर्व सुविधा आणि प्रकल्प यांच्या नियमनात सहभागी होण्यासाठी सर्व राज्य सरकारशी याबाबत माहितीची देवाणघेवाण सुरु असल्याचे सांगितले जात आहे. या वर्षात करण्यात आलेल्या विविध कामांचा तपशील या योजनेत आहे. २०२१ ते २०२५ पर्यंत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती येथे मिळणार आहे. या पुढे २०२५ पर्यंत जेवढे काही विकास कामे केली जातील त्यांचा विकास आरखडा तयार करण्यात येईल.त्या सोबतच या योजनेद्वारे मास्टर प्लॅनने देशासाठी एक निर्णय प्रक्रियेमध्ये विकास साधता येईल असे सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या