पहिली कसोटी: शिखर धवनचे खणखणीत शतक

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान गॅले येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर शिखर धवनने खणखणीत शतक केले आहे. शिखर धवनच्या शतकी खेळीच्या जोरावर भारत १९१ धावांवर १ बाद अशा मजबूत स्थितीत आहे.चेतेश्वर पुजारानेही दणदणीत अर्धशतक केले आहे. शिखर धवनचे हे पाचवे शतक असून मालिकेतील पहिल्या कसोटीमध्ये शतक करण्याची त्याची ही चौथी वेळ आहे.

शिखर धवनच्या ५ शतकांपैकी परदेशातील त्याच हे चौथ शतक आहे.