fbpx

खा. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात पूरग्रस्तांसाठी १०० डॉक्टरांची फौज रवाना

प्राजक्त झावरे पाटील : शिवसेनेच्या माध्यमातून पूरग्रस्त सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील बांधवांसाठी सलग 5 दिवस महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज रविवारी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे येथून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात महाआरोग्य शिबीरासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 100 डॉक्टरांचे पथक रवाना झाले.

महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून सलग 5 दिवस हजारो नागरिकांची वैद्यकीय तपासणी, रक्त तपासणी आणि औषध वाटप करण्यात येणार आहे. तसेच सर्व डॉक्टरांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी सॅनेटरी नॅपकीन, टॉवेल, अंतर्वस्त्र, पेस्ट, बिस्किट व इतर जीवनावश्यक वस्तू सोबत घेतल्या आहेत. त्यासोबतच ठाणे जिल्ह्यातील विविध शहर शाखांची मदत देखील या पथकासोबत रवाना झाली आहे.

गेली आठवडाभर आपुलकीने पूरग्रस्त भागात मदतीकरिता ठाण मांडून असलेले राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रामाणिक मेहनतीची सगळीकडे स्तुती होत असताना त्यांचे पुत्र देखील १०० डॉक्टरांच्या टीम च नेतृत्व करून पूरग्रस्त भागात रवाना झाले आहेत. डॉ. श्रीकांत हे स्वतः MS असून मागच्या वर्षी केरळ मध्ये आलेल्या आपत्तीत देखील त्यांनी प्रत्यक्ष पोहचून उत्तम काम केले होते.

महत्वाच्या बातम्या