fbpx

पोहरादेवी तार्थक्षेत्रासाठी आणखी 100 कोटींचा निधी देणार

टीम महाराष्ट्र देशा- देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आणखी 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. तसंच बंजारा समाजाची संस्कृती जपण्यासाठी बंजारा अकादमी स्थापण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं केली.

पोहरादेवी विकास आराखड्यातील ‘नगारा’रुपी वस्तुसंग्रहालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. या स्मारकासाठी 25 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पोहरादेवी इथून समृद्धी महामार्ग जाणार आहे. त्यासोबतच वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गावर पोहरादेवी इथं स्थानक देण्यात येणार आहे. याप्रसंगी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंजारा समाजाच्या मागण्यांबाबत आपण सहमत असल्याचं सांगितले. पोहरादेवी स्मारकावर जगभरातून पर्यटक यावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली