बलात्कारी बाबाला न्यायालयाचा दणका; आता एवढे वर्ष तुरुंगात डेरा 

बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमित राम रहिम सिंग याला १० वर्षे शिक्षेचा फैसला सुनावण्यात आला . आज रोहतकमधील तुरुंगात ही सुनावणी झाली  बाबाला दोषी ठरवल्यानंतर झालेला हिंसाचार पाहता हरयाणा आणि पंजाबमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान बाबाच्या समाजसेवी कार्याचा विचार करता त्यांना कमी शिक्षा देण्याची याचना बाबा राम रहीम आणि त्यांच्या वकीलाकडून करण्यात आली, तर दुसऱ्याबाजूला त्याला जास्तीत जास्त शिक्षा करण्याची मागणी सीबीआयने केली होती

बाबा राम रहीमला रोहतकच्या कारागृहातच आज  शिक्षा सुनावण्यात आली. यासाठी सीबीआय न्यायालयातून न्यायाधीश जगदीप सिंग यांना विशेष हेलिकॉप्टरने रोहतक ला गेले होते .