भगत सिंह नाटकाची रंगीत तालीम सुरू असताना मुलाला लागला गळफास

भगतसिंह

बदायू – उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बदायूतील बाबट गावात स्वातंत्र्यदिनानिमित्त शहीद भगतसिंह यांच्यावरील नाटक विद्यार्थी सादर करणार होते. त्या नाटकाच्या सरावादरम्यान भगतसिंहाची भूमिका साकारणारा विद्यार्थी भगत सिंह फासावर लटकल्याच्या घटनेची तालीम करत असताना अचानक त्याच्या पायाखालील स्टूल सरकला आणि गळफास लागून त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार भूरे सिंह यांचा मुलगा शिवम गुरुवारी घरी एकटाच होता. त्याचवेळी त्याच्या घरी त्याचे मित्र त्यांच्या घरी आले होते. स्वतंत्र्य दिनानिमित्तानं भगत सिंह यांचं नाटक सादर करण्याची योजना ठरली. त्यानुसार नाटकाची रंगीत तालीम सुरू झाली. या मुलाचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते.

15 ऑगस्टसाठी नाटक सादर करता यावं म्हणून ही मुलं अभ्यास करत होती. त्यांनी योजना तयार केली आणि त्यानंतर सराव करायला लागली. 10 वर्षांच्या चिमुकल्याला भगत सिंह यांची भूमिका करण्याची संधी मिळली. फाशीचा सीन करताना त्याच्या पायाखालचा स्टूल खाली पडला. त्यामुळे 10 वर्षांच्या चिमुकल्याच्या गळ्याभोवती फास आवळला गेला आणि त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, त्या ठिकाणी असणाऱ्या मुलांना त्यावेळी काहीच समजले नाही. फास आवळला गेल्यानंतर थोड्या वेळातच शिवम पूर्णपणे शांत झाला होता. त्यानंतर मुलांनी जोरजोरात आवाज केला आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले यानंतर शिवमच्या पालकांना तेथे बोलावून संपूर्ण प्रकरण सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या