मुंबईत दिवसभरात तब्बल १० हजार ३० नवे कोरोना रुग्ण

corona

मुंबई : देशात काल दिवसभरात कोविड-19 ची उच्चांकी रुग्णवाढ नोंदवली गेली. काल सकाळी संपलेल्या 24 तासात तब्बल 1 लाख 3 हजार 558 नवीन बाधितांची नोंद झाली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त होता तेव्हा सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ 97 हजार होती.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं काल संध्याकाळी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकानुसार राज्यात 47 हजार 288 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप असलेल्या महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि पंजाब मध्ये केंद्र सरकारने 50 विशेष आरोग्य पथके रवाना केली असून, यातील 30 पथके राज्यातल्या 30 जिल्ह्यांमध्ये लवकरच दाखल होत आहेत.

राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार पासून राज्यभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्याही झपाट्याने वाढतेय. गेल्या 24 तासांत मुंबईत तब्बल 10 हजार 30 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्येचा एका दिवसातील हा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना स्थिती अतिशय विदारक बनत असल्याचं चित्र या आकडेवारीतून पाहायला मिळत आहे.

मुंबईत आज कोरोना रुग्णांच्या संख्येनं 10 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर 7 हजार 19 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 77 हजार 495 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत आज दिवसभरात 31 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 19 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. तर मृतांमध्ये 20 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. अजून एक चिंताजनक बाब म्हणजे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवसांवर येऊन ठेपलाय. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के आहे. 30 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.79 टक्के झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या