अक्षय कुमार च्या या दहा गोष्टी माहित आहे का ?

 

  • अक्षय कुमारचे खरे नाव राजीव भाटीया असून तो मूळ दिल्ल्लीचा रहिवाशी आहे.अक्षय चे वडील हे सरकारी नोकरीत होते.अक्षय चा जन्म पंजाब मधील अमृतसर येथे झाला होता
  • अक्षय ला लहापणापासून खेळाची प्रचंड आवड होती. मार्शल आर्ट च्या ट्रेनिंग करता अक्षय बैंकॉक गेला होता.
  • अक्षय कुमार ने महेश भट यांच्या “आज” या चित्रपटात एक ७ सेकंदाचा रोल केला होता.या चित्रपटातील मुख्य हिरोचे नाव अक्षय असल्यामुळे अक्षय ने आपले नाव राजीव बदलून अक्षय केले.
  • खिलाडी हा अक्षय कुमार चा पहिला यशस्वी चित्रपट.या चित्रपटापासून अक्षय ला त्यांची खिलाडी ही ओळख मिळाली
  • बैंकॉक मध्ये असताना अक्षय ने वेटर पासून ते कार्ड विकण्यापर्यत सर्व काम केली.कामाच्या शोधात अक्षय बांगलादेशात देखील जाऊन आला.कोलकतामध्ये देखील अक्षय ने एका पर्यटन कंपनीत काम केले.त्यांतर तो मायानगरी मुंबईत आला\
  • अक्षय कुमार करोडो रुपये जरी कमावत असला तरी तो महिन्याला ५ ते १० हजार रुपये खर्च करतो.
  • अक्षयकुमारने भारतीय सैनिक व त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाला एक वेबसाईट बनविण्याची विनंती केली होती.भारत के वीर नामक वेबसाईट गृह मंत्रालयाने बनविली.या द्वारे अनेक सैनिकांना मदत केली जाते.
  • अक्षय कुमार रोज सांयकाळी ७ वाजण्याच्या आत जेवण करतो.त्यांच्या मते ७ वाजण्याच्या आत जेवण केल्यास शरीरातील कॅलरी बर्न होत नाहीत .
  • अक्षय चे ७ चित्रपटात राज हे नाव होते तर ८ चित्रपटात विजय हे नाव होते.
  • हिंदी चित्रपट जगतात अक्षय कुमार ला एक्शन खिलाडी असे ओळखतात कारण हिंदी सिनेमात अक्षय ने जवळपास  आठ चित्रपटाचे नाव   खिलाडी असे आहे.-खिलाडी, मैं खिलाडी तू अनाड़ी, खिलाडियों का खिलाडी, इंटरनेशनल खिलाडी, सबसे बड़ा खिलाडी, मिस्टर एंड मिसेज खिलाडी, खिलाडी 420, खिलाडी 786