दहावी-बारावी परीक्षेतील शंभर कोटींचा धंदा आला निम्यावर

10 th 12 th exam preparation

अभय निकाळजे (वरिष्ठ पत्रकार) औरंगाबाद : दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या परिक्षांच्या काळात तेजीत असणारा पाॅकेट गाईडचा धंदा निम्मा झाला आहे. राज्यात शंभर कोटींची उलाढाल होणाऱ्या या धंद्याला काॅपी मुक्तीची झळ बसली आहे. म्हणून आता हे प्रकाशक विद्यापीठीय पदवी अभ्यासक्रमांकडे वळले आहेत.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असणारे पाॅकेट गाईडची विक्री ऐन परीक्षेच्या काळात जोरात असायची. पण ती विक्री एकदम घटली आहे. ‘इन माय पाॅकेट (आयएमपी), कोहिनूर, स्पार्क, चॅम्पियन, विनर अशा नावाने ते गाईड प्रसिद्ध आहेत. अगदी हातात मावेल एवढ्या आकाराचे ते गाईड आहेत. त्याची किंमत मुलाचा चेहरा पाहून विक्रेता ठरवतो. वीस रूपयांपासून या गाईडच्या किंमती आहेत. परीक्षेत हामखास पास होण्याची खात्री हे गाईड देतात.

Loading...

औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, लातूर, नांदेड, अकोला, बुलडाणा, अमरावती, अशा दुय्यम शहरांमध्ये या पाॅकेट गाईडच्या विक्रीचा धंदा तेजीत असायचा. पण या वर्षापासून हा धंदा एकदम बसला. याचे प्रमुख कारण म्हणजे कागदोपत्री काॅपीमुक्त असणारे अभियान आहे. कागदोपत्री काॅप्या परीक्षेच्या कालावधीत होत नाहीत. पण या गाईडपेक्षाही परफेक्ट उत्तरे देणाराच सगळ्यांनी हायर केला आहे. तो म्हणजे त्या-त्या विषयाचा तज्ज्ञ शिक्षक पेपर आल्यानंतर काही वेळातच एक स्टॅर्ण्डड फाॅर्मेटमध्ये उत्तर पोहोचवतो. त्यासाठी शाळा-शाळांचे आणि शिक्षकांचे एकामेका सहाय्य करू धोरण आहे. त्यामुळे नापास होणारे पास आणि निकालही शंभर टक्के, हा फंडा यशस्वी झाल्याने पाॅकेट गाईडचे मार्केट डाऊन झाले आहे. पण प्रकाशकांनी हार मानलेली नाही. त्यांनी आता वेग-वेगळ्या विद्यापीठीय परीक्षांना लक्ष करीत, त्याचे पाॅकेट गाईड काढण्याचे टार्गेट घेतले आहे.Loading…


Loading…

Loading...