या असतील दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा ?

दहावी बारावी प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा.विद्यार्थीसोबत त्यांचे आई –वडील देखील दहावी बारावीला असतात. मुलांवर फार मोठ अपेक्षांच ओझ असत. यामुळे मुलांनवर फार तान येतो. मुलांचा तान कमी व्हावा. याकरता माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ गेली दोन वर्ष परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर करीत आहे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार पुढील वर्षी २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडेल. तर दहावीच्या परीक्षेसाठी १ मार्च २४ मार्च हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

राज्य शिक्षण मंडळाकडून अद्यापपर्यंत याबद्दलची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षण मंडळाकडून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक कधी जाहीर केले जाणार, याकडे आता विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत बोर्डाची परीक्षा घेतली जाते.

दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. संभाव्य वेळापत्रकानुसार दहावीच्या परीक्षेसाठी आता १६३ दिवस म्हणजे जवळपास पाच महिने शिल्लक आहेत. तर बारावीच्या परीक्षेसाठी जवळपास १५५ दिवस शिल्लक आहेत.
विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे.