सवर्णांना  10 टक्के आरक्षण; सरकारचा हा निर्णय बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण : आंबेडकर 

prakash-ambedkar

टीम महाराष्ट्र देशा – पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर मोदी सरकारने अनेक लोकप्रिय निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षणावरून सरकार मोठी खेळी केली आहे. सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

सरकारच्या या लोकप्रिय निर्णयावर आता विरोधी पक्षांकडून टीका होऊ लागली आहे. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा असताना मोदी सरकारचा हा निर्णय बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण असल्याची घणाघाती टीका भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

‘आगामी निवडणुकांना आता 90 दिवस उरले आहे, त्यामुळेच भाजप सरकारने 10 टक्के आरक्षणाची घोषणा केली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. तर दुसऱ्या बाजूला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते यांनी देखील या निर्णयावर टीका केली आहे. आर्थिकदृष्ट्या मागासांना 10 % आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे सरकारचा चुनावी जुमला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

1 Comment

Click here to post a comment