कॉंग्रेसच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता, डझनभर आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

congress

पटना – बिहारमधील लोकजनशक्ती पक्षात उभी फूट पडल्याचे चित्र आहे. लोकसभेतील सहापैकी पाच खासदारांनी पक्षनेते चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करून त्यांचे काका पशूपती कुमार पारस यांची नेतेपदी निवड केली. या बंडामुळे बिहारच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे.

या सर्व सगळ्या राजकीय घडामोडींमागे सत्ताधारी संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि नितीशकुमार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, लोकजनशक्ती पार्टीचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर आता कॉंग्रेसच्या आमदारांवर जेडीयूचा डोळा असल्याची चर्चा आहे.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांना चांगलाच संघर्ष करावा लागला. भाजपच्या मेहेरबानीमुळे मुख्यमंत्रीपद नितीशकुमार यांना मिळाले असले तरीही आता जेडीयूला मजबूत करण्याकडे नितीशकुमार यांनी मोर्चा वळविल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे १९ उमेदवार विजयी झाले होते. आता यापैकीच काही आमदारांना पक्षात आणण्याचे गुप्त प्रयत्न सुरु आहेत.

पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन टाळायचं असल्यास जेडीयूला १३ काँग्रेस आमदारांना गळाला लावावं लागेल. काँग्रेसचे १९ पैकी १० आमदार जेडीयूमध्ये जाण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.जेडीयूनं एका खासदाराकडे महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. हा खासदार त्याच्या जातीच्या आमदारांशी संवाद साधून त्यांना जेडीयूमध्ये आणण्याच्या प्रयत्नात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP