fbpx

१, २ नव्हे तब्बल १० आमदारांनी केला भाजपमध्ये प्रवेश

bjp flag

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणाच्या सारीपाटावर शह काटशहचं राजकारण सुरु झालं आहे. कधी कोण कोणाच्या गळ्याला लागेल आणि कोण कोणाची साथ सोडेल याचा काही नेम नाही.

याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एसडीएफला खिंडार पडले आहे. सिक्किममधील सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट (एसडीएफ)च्या दहा आमदारांनी नवी दिल्लीत मंगळवारी झालेल्या सोहळ्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि सरचिटणीस राम माधव यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. त्यातील माजी मुख्यमंत्री चामलिंग यांच्यासह पाच अन्य आमदार वगळता उर्वरित दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अनेक आमदारांनी भाजपचा रस्ता धरल्याने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. आगामी विधानसभा निवडणूक जवळ आली असताना सत्ताधाऱ्यानी राष्ट्रवादीच्या दिग्गज आमदारांना आपल्या पक्षात सामील करून घेतल्याने राष्ट्रवादी पक्षात अस्थिरता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या