१० नक्षलवाद्यांना कंठस्नान,सुरक्षा दलाची जबरदस्त कामगिरी

blank

टीम महाराष्ट्र देशा- छत्तीसगडमधील बीजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत १० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाल्याचं वृत्त आहे. घटनास्थळावरुन मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.

एसपी मोहित गर्ग यांच्या नेतृत्वाखाली स्पेशल टास्क फोर्स आणि डिस्ट्रीक्ट रिझर्व गार्ड्सच्या जवानांनी ही कामगिरी केली आहे.बीजापूरमध्ये काही नक्षलवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिलाल्यानंतर शोधमोहीम सुरु करण्यात आली होती.

शोधमोहीम सुरु असतानाच नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला.सतर्क सुरक्षा दलाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि १० नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवलं.