fbpx

मीरवाइजची जीभ कापून आणणाऱ्यास १० लाखांचे ‘इनाम’- गजराज जाटव

पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेता मीरवाइज उमर फारूखची जीभ कापून आणणाऱ्या व्यक्तीस  मध्य प्रदेशातील जनपद पंचायतच्या प्रमूख तसेच भाजप नेत्या संजू जाटव यांचे पती गजराज जाटव यांनी१० लाख रूपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.
नक्की काय म्हणाले आहेत गजराज जाटव?
मीरवाइजला पाकिस्तानवर इतकंच प्रेम असेल तर त्यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत पाकिस्तानला गेलं पाहिजे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला पराभूत करणाऱ्या पाकिस्तानच्या विजयावर जल्लोष करणाऱ्या मीरवाइजची जीभ कापून आणणाऱ्यास १० लाख रूपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करतो.मीरवाइजच्या या कृत्यामुळे माझ्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, स्वातंत्र्यानंतर जे मुस्लिम पाकिस्तानात गेले आहेत. त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते, याची जाणीवही त्यांनी करून दिली.त्यांनी लक्षात ठेवावं की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह या देशाच्या मातीतच दफन केला जाणार आहे. तरीही ते पाकिस्तानचे कौतुक करत आहेत. त्याचबरोबर आपल्या धर्मातील इतर लोकांचीही ते दिशाभूल करत आहेत.
या लोकांनी माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून काही तरी शिकायला हवे. त्यांनी कायम भारताच्या हिताचा विचार केला.
कोण आहेत गजराज जाटव ?
  जाटव हे स्वत: भाजपच्या कुठल्या पदावर नाहीत परंतु  त्यांची  पत्नी संजू जाटव या जनपद पंचायतच्या प्रमूख आहेत.