प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यापीठाने दिले १० लाखांंचे विमा कवच

सोलापूर : सोलापूर विद्यापीठ प्रवेशित प्रत्येक विद्यार्थ्याला १० लाखांंचे विमा कवच देण्यात आले आहे. विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक सूर्यकांत शिंदे यांनी ही माहिती दिली. विमा संरक्षणाचा लाभ पूर्वी एक लाखापर्यंत मर्यादित होता. आता ही रक्कम १० लाख केली आहे. विमाधारकाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्यास वारसदारास १० लाखांचा लाभ मिळू शकतो. विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही हा लाभ मिळणार आहे. वार्षिक प्रिमिअम सरासरी ९० रुपयांच्या आत आहे. एका वर्षासाठी हे विमा कवच प्राप्त होईल.