राज्यात एकाच वेळी १० लाख विद्यार्थी खेळणार फुटबॉल

मुंबई : पुढील महिन्यामध्ये भारतात १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेच आयोजन करण्यात आल आहे. या निमित्ताने संपूर्ण भारतात १ कोटी १० लाख जणांनी फुटबॉल खेळण्याची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. याला प्रतिसाद म्हणून  महाराष्ट्रात आज एकाच दिवशी १० लाख विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत.

राज्यातील  फुटबॉल महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल आहे. मुंबईतील जिमखान्यात हा कार्यक्रम पार पडला असून यावेळी क्रीडामंत्री विनोद तावडेही उपस्थित होते.

आज राज्यभरात मुंबईच्या डबेवाल्यापासून ते रिक्षा चालक, विद्यार्थी अनेक क्षेत्रातील मान्यवर फुटबॉल खेळणार आहेत

You might also like
Comments
Loading...