चिंताजनक : प्राणी आणि वनस्पतींच्या सुमारे १० लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर

टीम महाराष्ट्र देशा : इंटरगव्हर्नमेंटल सायन्स-पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड ईकोसिस्टम सर्व्हिसेस (IPBES) च्या ताज्या अहवालाने हा इशारा दिला आहे की, मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरील प्राणी व वनस्पतींच्या सुमारे १० लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्याला मानवाची कृत्येच कारणीभूत आहेत, परंतू यातून सरतेशेवटी मानवाचेच नुकसान होणार आहे. त्यामुळे मानवाने याबाबत काळजी घेणे महत्वाचे आहे.

Loading...

या अहवालातील ठळक बाबी

  • येत्या दहा वर्षांत किमान १ लक्ष प्राणी व वनस्पती नष्ट होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • गेल्या १० दशलक्ष वर्षांत पृथ्वीवरील जीवसृष्टीची जेवढी हानी झाली नाही त्यापेक्षा दहा ते शंभर पट वेगाने हानी आता सुरू आहे. त्यामुळे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर डायनॉसॉर नष्ट झाले होते त्यानंतरची ही सर्वात मोठी हानी असणार आहे.
  • ज्या पद्धतीने आपण उत्पादन करतो, वापरतो, त्या सर्व घटकांमध्ये स्थित्यंतरात्मक बदल केला नाही तर ही नष्ट होण्याची प्रक्रिया सुरूच राहणार.
  • जवळजवळ निम्मे उभयचर आणि एक तृतीयांश समुद्री सस्तन प्राणी धोक्यात आहेत. सन १९७० पासून २००० सालापर्यंतच्या काळात जागतिक अधिवासाच्या ३०% नष्ट झाले आणि अंदाजे १७००+ आर्द्र बेटांपैकी ८५ % गायब झाली.
  • दरवर्षी इंग्लंडच्या आकाराइतके जंगल कापले जाते त्यामुळे कार्बन डायॉक्साइड वाढत आहे. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, रशिया, पोर्तुगाल, कॅलिफोर्निया व ग्रीस या देशात वणवे लागत आहेत. जागतिक तापमान वाढीमुळे जैवविविधता धोक्यात आली आहे.Loading…


Loading…

Loading...