आईच्या हातातून पळवले दहा दिवसांचे बाळ; पुण्यात भरदिवसा धक्कादायक प्रकार

Breaking News

पुण्यातील बोपोडी येथे रिक्षातून आईला धक्कादेऊन दहा दिवसांचे बाळ पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिला तिच्या दहा दिवसांच्या बाळाला घेवून खासगी रुग्णालयात उपचारासाठी आली होती. उपचारानंतर घरी परतत असताना हा प्रकार घडला

खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा खान (वय २६ रा. दापोडी) या आपल्या मुलीला घेवून रुग्णालयात गेल्या होत्या. दुपारी १२ वाजता दरम्यान रुग्णालयातून घरी परतत असताना त्या एका रिक्षामध्ये बसल्या . रेश्मा खान ज्या रिक्षात बसली त्या रिक्षात आधीच एक महिला बसली होती. रिक्षा काही अंतरावर गेल्यानंतर रिक्षात बसलेल्या त्या अज्ञात महिलेने रेश्माला धक्का देत तिच्या मांडीवरुन बाळाला हिसकावून घेऊन पळ काढला

याप्रकरणी खडकी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.