प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांच्या यादीत भाजपचे १० खासदार आणि १७ आमदार

bjp-flag-representational-image

मुंबई: असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीएआरने देशभरातील प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदार-खासदारांबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भाजपचे १० खासदार आणि १७ आमदारांचा सामावेश आहे. यामध्ये ४ आमदार महाराष्ट्रातील असून शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचेही यादीत नाव आहे.

प्रक्षोभक भाषणाप्रकरणी भाजपच्या १० खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. देशभरातील विद्यमान ४३ आमदारांनी सुद्धा प्रक्षोभक भाषणाप्रकरणी गुन्हा असल्याचे जाहीर केले होते.  प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांमध्ये महाराष्ट्रातील ४ आमदारांचा समावेश आहे. तर तेलंगणात सर्वाधिक ११, उत्तर प्रदेश ९, बिहार ४, आंध्र आणि कर्नाटक प्रत्येकी ३, उत्तराखंड आणि प. बंगाल प्रत्येकी २, तर गुजरात, मध्य प्रदेश, तामीळनाडू, राजस्थान आणि झारखंडमध्ये प्रत्येकी १ आमदारावर प्रक्षोभक भाषणप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

महाराष्ट्रात गुन्हा दाखल असलेले आमदार आणि खासदार

-हर्षवर्धन जाधव, शिवसेना आमदार, कन्नड, औरंगाबाद
-गुलाबराव पाटील, शिवसेना आमदार, जळगाव
-शिरीष चौधरी, अपक्ष आमदार, अमळनेर, जळगाव
-संभाजी पाटील, बेळगाव
-बद्रुद्दिन अजमल,खासदार
-एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी
-मुरली मनोहर जोशी,खासदार
-लालकृष्ण अडवाणी,खासदार
-केंद्रीय मंत्री उमा भारती