बाजार समितीची 10 एकर जागा मनपाला

बाजार समिती

मनपाने शेवटी कचरा टाकण्यासाठी जागा शोधली असून महानगरपालिकेची कृषी बाजार समितीकडे 10 कोटीची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी आज मनपा आयुक्त महापौर कृषी बाजार समितीचे सभापती यांची आज संयुक्त बैठक झाली. या बैठकीत 1998 ला महानगर पालिकेला देण्यात आलेला 10 एकरचा भूखंड मनपाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला.बाजार समितीच्या कचऱ्यासह परिसरातील 10 वार्डाच्या कचऱ्याची विल्हेवाट या जागेवर केली जाणार आहे . आज बाजार समितीच्या कार्यालयात महापौर नंदकुमार घोड्ले , आयुक्त नवल किशोर राम , उपमहापौर विजय ओताडे . बाजार समितीचे सभापती राधाकृष्ण पठाडे आदींची उपस्थिती होती.