आमदार बच्चू कडू यांना १ वर्षाची शिक्षा

वाहतूक पोलिसाला केली होती मारहाण

अमरावती : प्रहार युवा संघटनेचे ते संस्थापक, आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी अचलपूर कोर्टाने त्यांना एक वर्षाची शिक्षा व ६००रु दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.

मागील वर्षी २४ मार्च ला आमदार बच्चू कडू हे परतवाडा एस टी डेपो चौकातून जात होते. त्यावेळी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांना तिथे अनेक खासगी ट्रॅव्हल्स उभ्या असल्याच्या दिसल्या. त्यावेळी आमदार कडू यांनी त्या परिसरातील वाहतूक पोलीस इंद्रजीत चौधरी यांना बसेसवर कारवाई का करत नाही, असा जाब विचारला. त्यावेळी आमदार कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अश्लिल शिवीगाळ करुन वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा आरोप होता. त्यामुळे आमदार कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या प्रकरणात आमदार बच्चू कडू यांना आज शिक्षा सुनावण्यात आली

You might also like
Comments
Loading...