दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय संघ सज्ज, अशी आहे संघबांधणी

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय संघाने वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर धुळ चारल्यानंतर टीम इंडिया आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे.यासाठी भारतीय संघाची आज कसोटी मालिकेसाठीचा निवड करण्यात आली आहे. या कसोटी मालिकेमधून लोकेश राहुलला डच्चू देण्यात आला असून त्याच्या जागी शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे.

लोकेश राहुलला डच्चू मिळाल्याने मयांक अग्रवाल सोबत रोहित शर्मा हा सलामीला उतरणार हे पक्के झाले आहे. भारतीय संघाची घोषणा केल्यानंतर निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनीही रोहित शर्माला सलामीला संधी देण्यात येईल हे स्पष्ट केले. आफ्रिकेचा संघ तीन ट्वेंटी-20 आणि तीन कसोटी सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. 15 सप्टेंबरपासून ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठीचा ट्वेंटी-20 संघ आधीच जाहीर करण्यात आला आहे

भारतीय संघ : विराट कोहली, मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शुभमन गिल.