fbpx

मुंबई काँग्रेसमध्ये एक अध्यक्ष आणि दोन कार्याध्यक्षांची कार्यकारणी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कॉंग्रेसकडून कार्यकारणीत बदल करण्यात येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कॉंग्रेसमध्येही बदल करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र काँग्रेसप्रमाणे मुंबई काँग्रेसमध्येही एक अध्यक्ष आणि दोन कार्याध्यक्षांची नेमणूक होण्याची शक्यता आहे. मिलिंद देवरा यांच्याकडे अध्यक्षपद कायम राहून एकनाथ गायकवाड आणि हुसेन दलवाई यांना कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यापूर्वी कॉंग्रेसने बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी तर नितीन राऊत, यशोमती ठाकूर, बसवराज पाटील, विश्वजीतक कदम आणि मुझफ्फर हसन यांची कार्याध्यक्षपदी निवड केली आहे.