पार्थ पवारांच्या गाडीचा ड्राईव्हर होणंं भोवलं, अपहरण करून केलं बेशुद्ध

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांच्या गाडीच्या चालका बरोबर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गाडीचा चालक मनोज ज्योतीराम सातपुते याचे मुंबईतून अपहरण करून त्याला बेशुद्ध करून पारनेर तालुक्यात सोडण्यात आल आहे.

सध्या मनोज सातपुते शिक्रापूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र हा अपहरणाचा घडलेला प्रकार अतिशय रंजक आहे. अपहरणकर्त्यांनी ‘तु पार्थ पवारांचा ड्रायव्हर का ? ‘ असे म्हणून अपहरण केले आणि बेशुध्द करून नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात सोडण्यात आले. याबाबतची फिर्याद खुद्द मनोज सातपुते यांनी शुद्ध आल्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत मनोज सातपुते म्हणाले की, मुंबईत कुलाबा बेस्ट डेपोजवळ उभा असताना एक लाल रंगाची ओमनी गाडी माझ्याजवळ आली व तू पार्थ पवारांच्या गाडीचा चालक आहेस का ? आम्हाला त्यांना भेटायचे आहे, असे म्हणून मला गाडीच्या पुढच्या सीटवर बसविले.मात्र, त्यापुढे काहीच आठवत नाही असे सातपुते म्हणाले. तसेच सातपुते यांच्या शरीरावर काही ठिकाणी मारहाण केल्याचे निशाण आहेत. सातपुते यांच्या अपहरणाचा किस्सा ऐकून पोलीस चाक्रवले आहेत. तर अज्ञातांवर गुन्हा दाखल करून शोध घेत आहेत.

दरम्यान संपूर्ण घटनेची माहिती स्वतः पार्थ पवार पोलिसांकडून घेत असून या प्रकरणाची सत्यता नेमकी काय याबाबत माहिती घेण्यासाठी खुद्द पार्थ पवार पोलिसांची भेट घेणार आहे.Loading…
Loading...