पंतप्रधान मोदींच्या आणि देशातील जनतेच्या पाठींब्यामुळेचं वैज्ञानिकांचे मनोधैर्य उंचावले : के सिवन

टीम महाराष्ट्र देशा : भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेने आता वेगळे वळण घेतले आहे. इस्रोच्या मुख्यालयाशी तुटलेल्या संपर्का नंतर चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरनं लँडर विक्रमचा शोध घेऊन फोटो पाठवला आहे. त्यामुळे चांद्रयान 2 मोहिम पुन्हा नव्याने सुरु होईल अशी आशा सर्वाना वाटत आहे. इस्त्रोच्या वैज्ञानिकांकडून याबाबत प्रयत्न सुरूचं आहेत. मात्र १४ दिवसाच्या आता लँडर विक्रमशी संपर्क झाला तर हे मिशन पुन्हा नव्याने सुरु होईल अशी माहिती इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी दिली आहे. तसेच पहिल्या प्रयत्नात आलेल्या अपयशा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि भारतीय जनतेने दिलेल्या धैर्यमुळेचं वैज्ञानिकांना मनोधैर्य उंचावल्याचं सिवन म्हणाले.

चांद्रयान 2 च्या लॅडिंगचे ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी इस्रोच्या मुख्यालयात हजर होते. मात्र ‘विक्रम’ चंद्रावर अलगद उतरू न शकल्याचे कळल्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञांचे मनोधैर्य वाढवले. विज्ञानात प्रयोग असतात, अपयश नाही असं पंतप्रधानांनी म्हटलं, असे म्हणत मोदींनी शास्त्रज्ञांना पुन्हा एकदा जोम्ने काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

याबाबत सिवन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला धीर व देशभरातून व्यक्त होत असलेल्या पाठिंब्याने ‘इस्रो’मधील वैज्ञानिकांना नवा हुरूप आला आहे. तसेच देशाने आम्हाला चांगला व सकारात्मक पाठिंबा दिला. पंतप्रधानांचं एक वेगळं रूप आम्हाला पाहायला मिळाल असेही सिवन म्हणाले.