बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येचं सत्र सुरुचं; आणखी एकाचा मृतदेह आढळला

crime

कोलकाता : पश्चिम बंगालमधील बलरामपूरमध्ये आज आणखी एका भाजप कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू झालाय. दुलाल कुमार असं या ३२ वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो आज सकाळी विजेच्या खांबाला लटकलेल्या अवस्थेत आढळा. या आठवड्यातील भाजपच्या कार्यकर्ता अशाप्रकारे लटकलेल्या अवस्थेत आढळण्याची ही दुसरी घटना आहे.

तीन दिवसांपूर्वी बलरामपूरमध्येच भाजपच्या युवा मोर्चातील एक कार्यकर्ता त्रिलोचन माहातो बलरामपूर परिसरातील सुपुर्डी गावात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यामुळे या दोन घटना संशयास्पद असून याची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

Loading...

दुलाल कुमारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालनानंतरच मृत्यूचे निश्चित कारण समजू शकेल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय चिटणीस राहुल सिन्हा यांनी या प्रकरणी तृणमूल काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले असून या प्रकरणांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!