हिंगोलीतील युवकाच्या अपहरणकर्त्यांची एक लाखाची मागणी

Kidnapping-Crime

हिंगोली : १९ ऑगस्ट रोजी अपहरण झालेल्या युवकाच्या पालकांना अपहरणकर्त्यांनी एक लाख रूपयांची खंडणी मागितली आहे. हिंगोली तालुक्यातील बळसोंड भागातील माऊली नगर येथील गणेश श्रीकृष्ण शिंदे या युवकाचे १९ ऑगस्ट रोजी अपहरण झाले होते. हिंगोली शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हाही दाखल केला आहे. गणेशचे अपहरण हिंगोली शहरातुन झाले होते तो एटीएम मधून पैसे काढण्यासाठी हिंगोली शहरात आला होता. तर त्याला दोन ते तीन जणांनी पकडले. आणि पैशाची मागणी केली तुमच्या खात्यात फैसे टाका असेहि सांगितले. त्यांनी बॅकेत टाकालेले पैसे नांदेड येथील पंजाब नॅशनल बँकेतून काढल्याचा एसएमएस आला. ५० हजार रुपये लवकर जमा करा अन्यथा गणेशचे नाक कापून व्हॉटसअ‍ॅपवर टाकतो असेहि अपहरणकर्ते म्हणत आहेत. पोलिसांकडून मिळत मोबाईल असलेल्या लोकेशननुसार तपास होत असून अदयाप शोध लागला नाही.