fbpx

#हिंगोली दंगल : नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आवाहन

टीम महाराष्ट्र देशा : हिंगोली येथे सोमवारी 12 ऑगस्ट रोजी दोन समाज गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली होती. हिंगोली विधानसभा मतदारसंघातील चिंचोली निळोबा येथे आज कावड यात्रा निघाली होती. यावेळी ही यात्रा इदगाह मैदानाजवळ आल्यानंतर काही जणांनी वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये 25 ते 30 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर हिंदू-मुस्लीम वाद झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थिती वेळीचं आटोक्यात आणली होती.

दंगलीत दगडफेक झाल्या प्रकरणी 15 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख अशोक घोरबांड यांनी दिली आहे. या घटनेप्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असं आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी केलं आहे.

दरम्यान श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दरवर्षी कयाधू नदी तीरावरील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिर येथून कावड यात्रा काढली जाते. कळमनुरीकडे कावड रवाना होत असताना इदगाह मैदानाजवळ दोन गटामध्ये राडा झाला. त्यामुळे पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. जमावाला पांगवण्यासाठी आणि वाद शांत होण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये 10 ते 15 जण जखमी झाले आहेत.

घटना सविस्तर

पवित्र श्रावण महिन्यात दुसऱ्या सोमवारी दरवर्षी हिंगोली जिल्ह्यातील एका महादेव मंदिरापासून हिंगोलीच्या ओम कयाधु अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत भव्य कावडयात्रा काढतात. मागील पाच वर्षांपासून या कावडयात्रेत गर्दी वाढत आहे. मागील वर्षी दहा हजार शिवसैनिक व शिवभक्त हिंदू नागरिक सहभागी झाले होते. यावर्षी देखील अशीच जोरदार तयारी करण्यात आली होती. हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या कयाधु नदीचे जलपूजन व महादेवाची पूजा करुन कावड कळमनुरीकडे घेऊन जाण्यासाठी यात्रेकरू निघाले होते.

बकरी ईदच्या निमित्त मुस्लीमांच्या नमाज अदा करण्याची वेळ संपल्यावर कावड घेऊन जाण्याची खबरदारी घेण्यात आली होती. मात्र, ईदगाहवर मोठा मुस्लीम जमाव होता. कावडयात्रेसोबत ढोल-ताशा, श्री शिवशंकर महादेवाचे गीत वाजत व जय भवानी … जय शिवाजी…, हर हर महादेव अशा घोषणा देत यात्रा मार्गस्त झाली होती. त्यावेळी कुरापत काढत काही समाजकंटकांनी घोषणाबाजी करू नका, गाणे बंद करा, असे सांगितले. त्यावर ईदगाहपासून काही अंतरापर्यंत गाणे बंद करण्याची तयारी दाखवत यात्रेकरुंनी सामजस्याची भूमिका घेतली.

तरीही टार्गट समाजकंटकांनी कावडयात्रेच्या दिशेने दगड फेक केली. तसेच औंढा रस्त्यावरील रिक्षा, कार अशा खासगी वाहनांवर दगडफेक करून तोडफोड केली. या दगडफेकीत शिवसेनेचे नगरसेवक तथा जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांचे भाऊ श्रीराम बांगर यांना डोक्याला दगड लागले असून ते जखमी झाले आहेत.