इंग्रजकालीन ‘बाबूंचा’ प्रोटोकॉल बंद करण्यासाठी अण्णा सरसावले

Anna Hazare

टीम महाराष्ट्र देशा – भारतातून इंग्रज जाऊन ७२ वर्षे झाली आहेत. मात्र आजही त्यांनी सुरु केलेल्या काही प्रथा देशात पाळल्या जात आहेत. यातील एक प्रथा म्हणजे आपल्या न्याय हक्कासाठी उपोषणे, आंदोलन करणाऱ्यांना खुर्चीतच बसलेल्या म्हणजेच खुर्चीमधून न उठता अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारणे. सारख्या प्रथा आजही सुरु आहेत. आता ही इंग्रज कालीन परंपरा बंद करण्यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे पुढे सरसावले आहेत.

अण्णा हजारे यांनी लोकपालच्या मुद्यावरून पुकारलेल्या आंदोलनावेळी राळेगणसिद्धीमधील नागरिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. यावेळी संबंधित अधिकाऱ्याने बसूनच निवेदन स्वीकारले होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडल्यानंतर अण्णांनी हा मुद्दा हाती घेतला आहे.

आपल्या न्याय मागण्यासाठी जनता सरकारी कार्यालयाच्या गेटवर जाते. अशावेळी अधिकाऱ्याने गेटवर जाऊन निवेदन स्वीकारणे गरजेचं आहे. मात्र तसे होत नाही. त्यामुळे इंग्रज जाऊन ७२ वर्षे झाली तरी त्यांचा प्रोटोकॉल सुरु आहे. हा प्रोटोकॉल लोकशाही वरचा आघात असून तो बंद करण्याची मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.Loading…
Loading...