नारायण राणेंना गांभीर्याने घेऊ नये, अजित पवारांचा टोला

blank

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप नेते नारायण राणे यांना गांभीर्याने घेऊ नका, असा सल्ला दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व आमदारांची आज वाय. बी. सी. येथे बैठक होत आहे. या बैठकीला जाण्यापूर्वी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाशिवआघाडीबाबत भाष्य करत नारायण राणे यांना टोला लगावला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाने शिवसेनाल फसवल असल्याची टीका नारायण राणे यांनी काल केली होती. यावर अजित पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले की, राणेंना किती गांभीर्याने घेयचं हे तुम्हीचं ठरवा. मंगळवारी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला देण्यात येणाऱ्या पाठींब्याबाबत स्पष्टीकरण दिले. तसेच उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान भाजप सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला होता. मंगळवारी माध्यमांशी बोलताना राणे यांनी हे सूचक विधान केले होते. या विधानानंतर सत्ता स्थापनेच्या शर्यतीत भाजपची होणार ‘री – एन्ट्री’ करणार का ? या चर्चेला उधान आले. तसेच शिवसेनेला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाने फसवले असल्याचे ही म्हंटले होते.

महत्वाच्या बातम्या