उजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन

सोलापूर  ( प्रतिनिधी ) – उजनी धरणावरील स्थानिक मच्छिमार सोमवार २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करमाळा येथील कोंढार चिंचोली डिकसळ पुलाजवळ जलसमाधी आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष सीताराम नगरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली.

परराज्यातील मच्छिमारांवर शासन नियमाप्रमाणे बंदी असल्याने उजनी धरणातून त्यांना कायमस्वरूपी मच्छिमारी बंद करण्यात यावी, त्यांना उजनीवर आणणाऱ्या लोकांवर मोक्कांतर्गत गुन्हे दाखल करावेत, उजनी जलाशयाचा मासेमारीचा कोणत्याही प्रकारचा ठेका काढण्यात येऊ नये, छोटी मासळी मारल्याने मत्स्य उत्पत्तीत प्रचंड प्रमाणात घट झाल्याने छोटी मासळी मरणाऱ्यांवर व सुकविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासह सौरऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात यावा आदी मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याचे नगरे यांनी सांगितले.