Share

Supriya Sule | अजित पवार राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या…

Supriya Sule | मुंबई : राष्ट्रवादी (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शिवीगाळ केली होती. यानंतर अनेक नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे बंधू अजित पवार (Ajit Pawar) यांनी अद्याप एक ट्विट देखील केलं नाही. एवढंच नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार शांत असल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवारांच्या या चुप्पीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रत्येकाला त्याचे एक पर्सनल आयुष्य असते, असे म्हणत अजित पवार त्यांच्या वैयक्तिक कामासाठी ते नॉट रिचेबल असू शकतात. म्हणून याचा अर्थ काही राजकीय असेल असे होऊ शकत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

काही तासांपूर्वी राजकीय पटलावर विरोधी पक्षनेते अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेला ओत आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार यांनी कोणत्याही विषयावर भाष्य केलेलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात बंड होणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

दरम्यान, संजय राऊतांच्या जामीनवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती. संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख हे आमचे लढवय्ये नेते आहेत. संघर्ष आहे प्रत्येकाच्या आयुष्याला लागलेला असतो. मात्र, ज्या पद्धतीने तिघांना अटक झाली, हे दुर्देवी होतं. एखाद्यावर जेव्हा अशी वेळ येते, तेव्हा त्यांचे कुटुंबीय मित्र परिवार कोणत्या परिस्थितीतून जातात, हे मी छगन भुजबळ यांच्यावेळी जवळून बघितलं आहे. त्यामुळे आज संजय राऊतांना न्यायालयाने जो न्याय दिला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | मुंबई : राष्ट्रवादी (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now