विशेष गृहसचिव अमिताभ गुप्तांच्या विरोधात गुन्हा नोंदवून घ्यावा, सोमय्यांंची मागणी

मुंबई : वाधवान बंधूंना लॉकडाऊनच्या काळात महाबळेश्वरला जाण्याची परवानगी पत्र दिल्या बद्दल राज्याचे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता हे  सध्या वादाच्या  भोवऱ्यात  अडकले आहेत. तर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अमिताभ गुप्ता    यांच्या  विरोधात  मुलुंड   पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून घ्यावा अशी विनंती केली आहे.

सोमय्या यांनी बाबतची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. याआधीही किरीट सोमय्या यांनी वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वरला जाण्याची परवनगी मिळतेच कशी असा सवाल राज्य सरकारला व्हिडीओच्या माध्यमातून विचारला होता. तसेच अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर का पाठवण्यात आले असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. तर ही परवानगी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठींब्यानेचं देण्यात आली आहे, असा गंभीर आरोप देखील केला.

देश लॉकडाऊन असताना मुंबईतून महाबळेश्वरात दाखल झालेल्या वाधवान कुटुंबामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सात गाड्यांमधून हे 23 जण मुंबईतून बुधवारी  सायंकाळी साडेपाच वाजता महाबळेश्वरमध्ये आले. डीएचएसएल दिवान हौसिंग फाईनान्स यांच्या बंगल्यावर हे सर्वजण वास्तव्यास होते. मात्र चौकशी होताच वाधवान बंधूंना होम क्ववारांटाईन करण्यात आले.