Share

Manisha Kayande | “शेवटी सी ग्रेड सिनेमाची नायिका, हनुमान चालीसा…”, मनिषा कायंडेंची नवनीत राणांवर बोचरी टीका

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या व्हिडीओचा एक फोटो शेअर करत शिवसेना नेत्या मनिषा कायंडे (Manisha Kayande) यांनी अतिशय खालच्या शब्दात त्यांच्यावर टीका केली आहे. नवनीत राणा यांनी त्यांच्या तरुण वयात सी ग्रेड चित्रपटात काम केलं होतं. यावरुन मागे एकदा किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी देखील त्यांच्यावर टीका केली होती.

मनिषा कायंडे यांची बोचरी टीका :

नवरात्री मध्ये अनेक ठिकाणी नवनीत राणा मंडळांना भेट देतात. यावेळी त्या स्वतः देखील गरबा खेळतात. यातील एका व्हिडीओचा स्क्रीनशाॅट मनिषा कायंडे यांनी शेअर केला आहे. तसेच शेवटी सी ग्रेड सिनेमाची नायिका हनुमान चालीसा काय आणि अल्ला के बंदे काय? यांना ना धर्म ना जातपात यांची सर्वकाही नौटंकी, असा टोला मनिषा कायंडे यांनी नवनीत राणांना लगावला आहे.

 मनिषा कायंडे यांचं ट्विट :

किशरी पेडणेकरांनी देखील केली होती टीका :

मनिष कायंडे यांच्या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपुर्वी १३व्या वर्षी ज्या पोरीनी घाणेरडा पिक्चर मध्ये काम करुन प्रसिद्धी मिळावली तिच्यावर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी राणा यांच्यावर टीका केली होती.

नवनीत राणा यांचा गरबा झाला होता व्हायरल :

नवरात्रीच्या (Navratri) पहिल्या दिवशी नवनीत राणा यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली असून यावेळी नवनीत राणा यांना गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यानंतर नवनीत राणांनी तरुणांसोबत गरबा खेळण्यास सुरुवात केली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या व्हिडीओचा एक फोटो शेअर करत शिवसेना नेत्या मनिषा कायंडे (Manisha Kayande) यांनी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now