Share

Ashish Shelar | “… म्हणून उद्धव ठाकरेंनी पक्षाचं नाव बदलून ‘रडकी सेना’ ठेवाव”, आशिष शेलारांचा घणाघात

Ashish Shelar | मुंबई : अंधेरी पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. यापुर्वी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या राजीनाम्यावरुन विरोधकांनी सत्ताधारकांवर अनेक आरोप केले होते. यापुर्वी देखील सत्ताधारकांवर अनेक आरोप करण्यात आले होते. यावरच भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरे यांना टोला –

सत्तेत असताना केंद्र सरकारच्या नावानं, विरोधी पक्षात असताना कधी न्यायालयाच्या नावानं, कधी निवडणूक आयोगाच्या नावानं उद्धव ठाकरे रडतात. उद्या अंधेरीत पराभूत झाला तर अंधेरीच्या जनतेच्या नावानं रडतील त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना ही रडकी सेना आहे, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरुन देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी भाजपा घाणेरडे राजकारण करत नाही. पुढेही करणार नाही. ऋतुजा लटकेंचा राजीनामा ही तांत्रिक बाब होती. त्याचा भाजपाशी संबंध नव्हता. भाजपा- बाळासाहेबांची शिवसेना-आरपीआय म्हणून मी प्रतिनिधित्व करणार आहे. विरोधकांचे आव्हान वाटत नाही, असं ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी पक्षाचं नाव बदलून ‘रडकी सेना’, असं ठेवाव – आशिष शेलार

अनिल परब (Anil Parab) यांच्यासह बाहेरचे लोक आणि मुरजी पटेल (Murji Patel), स्थानिक असा हा संघर्ष आहे. या निवडणुकीत भाजपा- बाळासाहेबांची शिवसेना-आरपीआय गटाच्या उमेदवाराचा २५-३० हजार मताधिक्यांनी विजय होणार आहे असा विश्वास शेलारांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Ashish Shelar | मुंबई : अंधेरी पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. यापुर्वी ऋतुजा लटके (Rutuja Latke) …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics