PM मोदींनी साधला सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद, लॉकडाऊनबाबत दिल्या ‘या’ सूचना

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी PM मोदींनी प्रत्येक राज्याने सुरक्षेची काळजी घ्यावी आणि राज्याच्या मदतीला केंद्र नेहमीच तयार असेल, अशा सूचना दिल्या.  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी  राज्य सरकार कशापाध्तीने काम करत आहे, या साऱ्याचा आढावा PM मोदींनी यावेळी घेतला.

मुखमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेवेळी PM मोदींनी  देशातील लॉकडाऊनच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली. राज्यांनी जनतेकडून लॉकडाऊनची कठोरपणे पालन करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच लोकांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासणार नाही याची काळजी राज्यांनी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी राज्य सरकारांना दिली.

यावेळी पंतप्रधान मोदींनी देशाच्या विविध भागातून मजुरांनी केलेल्या  पलायनाबाबत मोदींनी चिंता व्यक्त केली. तसेच मजुरांचे होत असलेले पलायन कुठल्याही परिस्थितीत रोखले गेले पाहिजे. त्यासाठी राज्यांनी शेल्टर होम आणि भोजनाची व्यवस्था करावी असेही मोदींनी सांगितले.

तसेच कोरोनाच्या वाढत्या संख्येबाबतही मोदींनी चिंता व्यक्त केली. ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतील, अशा व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डमध्ये पाठवावे, तसेच आशा व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटीन करावे. क्वारंटीन वॉर्ड वाढवावे लागले तर वाढवावेत, अशी सक्त सूचनाही मोदींनी केली.