कर्जमाफी मागणारे १० लाख शेतकरी बोगस – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

कोल्हापूर: कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये 80 लाख पात्र, तर दहा लाख बनावट शेतकरी असल्याचा दावा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात केला आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करताना अजूनही काही शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.

मात्र ज्यांची बँक अकाऊंट बोगस आहेत, अशा शेतकऱ्यांनाच या अडचणी येत असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं. हे सरकार शेतकऱ्यांचे असून, येत्या ऑक्टोबरअखेरपर्यंत कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा केली जाईल, असं आश्वासनही चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

“राज्यभरातून सुमारे 72 लाख ऑनलाईन अर्ज सरकारकडे आले आहेत. यासंदर्भात सरकारने काही समित्या नेमल्या आहेत. या समित्यांमार्फत त्या अर्जांची छाननी केली जाईल.राज्यभरात 89 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी अर्ज करतील,अशी अपेक्षा आहे.पण यापैकी सुमारे 10 लाख शेतकरी बनावट असल्याचा संशय आहे.त्यामुळे अशा बनावट शेतकऱ्यांनाच ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी येत आहे. पण उर्वरित 80 लाख शेतकरी मात्र कर्जमाफीचा लाभ घेण्यास पात्र आहेत. त्याची प्रक्रिया आता जलद सुरु आहेत. यामध्ये काही अडचणी आल्या, तर हे सरकार शेतकऱ्यांचेच आहे. त्यांच्यासाठी योग्यवेळी सवलतही दिली जाईल. कर्जमाफीची ही प्रक्रिया राबविताना काही गावात शेतकरीच उरले नसल्याचीह माहिती पुढे येत आहे”. असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केल आहे.

1 Comment

Click here to post a comment
Loading...