“कोर्ट आमच्यासाठी आहे, कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात” ; भाजप आमदार संजय कुटे यांचं अजब वक्तव्य

मुंबई : आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात अडचणीत सापडलेले भाजप नेते किरीट सोमय्यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला. कोर्टाने किरीट सोमय्या यांना अटकेपासून संरक्षण देताना पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्याची सूचना केली आहे. मात्र सोमय्यांना हाय कोर्टाने दिलासा देताच शिवसेना खासदार संजय राऊत हे पुन्हा आक्रमक झाले आहेत.

राऊत म्हणाले कि, “दिशा सालियन, मुंबई बॉम्ब प्रकरण ते विक्रांत घोटाळा करणाऱ्या आरोपींना एका रांगेत सर्वांना दिलासे कसे मिळतात? न्यायव्यवस्थेवर कुणाचा दबाव आहे? न्याय व्यवस्थेत विशेष असे लोक दिलासा देण्यासाठी बसवले आहेत का? ते कुणाच्या सूचनेने काम करत आहेत का?” असे अनेक सवाल संजय राऊत यांनी केले आहेत. तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील देशाच्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

यावरून भाजप आमदार संजय कुटे यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत सविस्तर बोलताना संजय कुटे म्हणालेत, “आम्हाला माहीत आहे शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा आमच्या विरोधात कितीही वापरल्या तरीही कोर्ट आमच्यासाठी आहे. कोर्टातून आम्हाला न्याय मिळतो. कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात. आम्हाला जे करायचे आहे ते आम्ही भविष्यात करणार आहोत,” असं आमदार कुटे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :