२६/११ चा हल्ला पाकिस्ताननेच केला – नवाज शरीफ

मुंबई- पाकिस्तानकडून भारतावर करण्यात आलेल्या २६/११ च्या भ्याड हल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र आपला या हल्ल्याशी काहीही सबंध नसल्याचं पाकिस्तानकडून सांगण्यात येत होतं.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पहिल्यांदाच मुंबई हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांचा हात असल्याची कबुल दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जागासमोर आलाय.ते एका पाकिस्तानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलतं होते.

यावेळी नवाज शरीफ यांनी दहशतवादी संघटनांवरही भाष्य केलं. काही ‘दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. त्यांना सीमा ओलांडायची आणि मुंबईत जाऊन 150 लोकांची हत्या करण्याची परवानगी द्यायला हवी का?,’ असं शरीफ यांनी म्हटलं आहे.’रावळपिंडीच्या दहशतवादविरोधी न्यायालयात आम्ही मुंबई हल्ल्याची सुनावणी का पूर्ण केली नाही ?,’ असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.पुढे ते म्हणाले की, ‘एका देशात एकच सरकार चालू शकतं. पाकिस्तानात मात्र अनेक समांतर सरकारं आहेत. त्यामुळे देश चालवायचा तरी कसा’ असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.