२०१९ मध्ये राज्यात भगवा फडकणार,उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार : राऊत

टीम महाराष्ट्र देशा-  राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचीच सत्ता येईल आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. एका वृत्तावाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले ?

भाजपाला आपण अजूनही मोठा भाऊ मानतो, पण आधी ठरल्याप्रमाणे भाजपा केंद्रात मोठा असून राज्यात शिवसेना आहे.राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचीच सत्ता येईल आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत हा आम्हा  शिवसैनिकांचा हट्ट आहे.