fbpx

संभाजी भिडे गुरुजी खरच प्राध्यपक होते का ?

SAMBHAJI-BHIDE-GURUJI

लातूर / प्रतिनिधी : कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर संभाजी भिडे याचं नाव महाराष्ट्रभर चर्चेत आलं. एक उच्चशिक्षित म्हणून पण यांची ख्याती आहे. तसेच त्यांनी प्राध्यापक म्हणून विद्यार्थांना देखील घडवले आहे.
शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष महाराष्ट्रात सर्वदूर चर्चेचा विषय असलेले संभाजीराव ( मनोहर) भिडे गुरुजी हे ५७ वर्षांपूर्वी लातूर येथीक दयानंद विज्ञान महाविद्यालयात एक वर्ष फिजिक्स विषयाचे प्राध्यापक होते त्याच वर्षी ते इथल्या पोलोटेक्निक कॉलेज मध्ये हा विषय शिकवत होते.

१९६१- ६२ मध्ये ते दयानंद कॉलेज मध्ये आपल्याला फिजिक्स विषय शिकवत असत. अशी आठवण त्यांचे त्यावेळी विद्यार्थी असलेले विश्ववनात होलकुंदे यांनी सांगितले. लातूर शहरात वास्तव्यास असताना ते गोरक्षणमधील ऐका खोलीत राहत होते . त्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन अविभक्त उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून कार्य केलं. कामा निमित्त ते लातूर हुन चक्क सोलापूर ला पायी चालत जात असत अशी हि एक आठवण रा. स्व. संघाचे शरदचंद परचुरे यांनी सांगितली.