शेवगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा विद्या लांडे यांच्या विरोधात अविश्वासाच ठराव 

शेवगाव : नगरपालिकेच्या नगराध्यक्षा विद्या अरुण लांडे यांच्या विरोधात आज २१ पैकी १५ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल करत या विषयावर तातडीने विशेष बैठक घ्यावी अशी मागणी केली आहे. अविश्वास ठराव दाखल करण्यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुद्धा सहभागी झाल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांची  पालिकेवरील पकड सैल झाली असल्याचे मानले जात आहे.

बाबद अधिक माहिती अशी की शेवगावला नगरपालिका झाल्य नंतर पहिल्यांदाच चुरशीची लढत होऊन सत्त्ता धारी राष्ट्रवादीचे नऊ,भाजपचे आठ तर अपक्ष चार नगरसेवक निवडून आले होते. काही अपक्षांची मदत घेत राष्ट्रवादीने पालिकेची सत्ता आपल्या ताब्यात मिळवण्यास यश मिळवले. नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक असताना चंद्रशेखर घुले यांनी आपले कट्टर समर्थक व पं.स. चे माजी सभापती अरुण लांडे यांच्या पत्नी विद्या लांडे यांची नगराध्यक्षपदी निवड केली. पालिका निवडणूक होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही, लांडे व त्यांच्या  स्वपक्षातील नगरसेवक व विरोधी नगरसेवक यांच्यात वारंवार वाद होऊन त्याचा परिणाम शहराच्या विकासावर होत होता.

Loading...

सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीच लांडे यांच्या राजीनामा घ्या असे साकडे चंद्रशेखर घुले यांना घातले होते मात्र त्या वेळी हे बंड थंड करण्यात घुले यशस्वी झाले होते मात्र काळाच्या ओघात पहिले पाढे पंचावन्न झाल्याने आज २१ पैकी १५ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत अविश्वास ठराव दाखल करत या विषयावर तातडीने विशेष सभा आयोजित करण्याची मागणी केली.

या संदर्भात दिलेल्या मागणीपत्रावर राष्ट्रवादीचे पालिकेतील गटनेते सागर फडके यांची सुद्धा सही असून, या मूळे राष्ट्रवादी मध्ये दुफळी पडली असल्याचे मानले जात आहे. आज अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या पत्रावर वर्षा लिंगे,इंदुबाई म्हस्के,शब्बीर शेख,सागर फडके,अजय भारस्कर,विकास फलके,वजीर पठाण,राणी मोहिते,रेखा कुसळकर,अरुण मुंडे,नंदा बोरुडे,सविता दहिवाळकर,अशोक आहुजा, कमलेश गांधी,शारदा काथवटे यांच्या सह्या आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले