शिवरायांच्या स्मारकाचं गुपचूप भूमिपूजन ही सरकारसाठी नामुष्की -जयंत पाटील

मुंबई – शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं आहे.  धक्कादायक बाब म्हणजे रात्रीच्या अंधारात शिवस्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन गुपचूप करण्याची नामुष्की या सरकारवर ओढवली, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केली आहे.

निधड्या छातीचे, लढवय्ये अशी ख्याती असलेल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन महाराजांच्या इतमामाला साजेसं करण्यात या सरकारला कमीपणा वाटला का? गेल्यावेळी एका कार्यकर्त्याचा भूमिपूजनावेळी मृत्यू झाला होता. नियोजनाअभावी हे घडलं होतं. एकूण सरकारची अवस्था काय आहे, या स्मारकाचं पुढे काय होणार, हेच यातून स्पष्ट होतंय, असंही पाटील म्हणाले.

You might also like
Comments
Loading...