शहीद सौरभ फराटे यांचे स्मारक पुणे महापालिका उभारणार – महापौर

फुरसुंगी भेकराई नगर येथील सौरभ फराटे हे दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. त्यांचे बलिदान पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून यथोचित स्मारक बांधण्यात येईल, अशी घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी यावेळी केली. तर यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले की, त्यांच्या स्मारकाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्रेरणा स्थान तयार करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.