व्हायबर’चे ‘सिक्रेट चॅट’ अजून मजबूत

व्हायबर या मॅसेंजरने आपल्या युजर्ससाठी आधीच प्रदान केलेल्या ‘सिकेट चॅट’ या फिचरला अजून मजबूत केले आहे. ‘सिक्रेट चॅट’च्या अंतर्गत दोन युजर्स हे एकमेकांशी ‘एंड-टू-एंड’ एनक्रिप्शनच्या सुरक्षेसह संवाद साधू शकतात. अर्थात कुणी तिसरा व्यक्ती हे संभाषण चोरून वाचू शकत नाही. याला आता व्हायबरने अदृश्य होणार्‍या संदेशाची जोड दिली आहे.
अर्थात आता ‘सिक्रेट चॅट’मध्ये समोरच्या व्यक्तीने संदेश वाचल्यावर तो आपोआप अदृश्य होईल. यामुळे कुणीही सुरक्षितपणे चॅटींग करू शकेल. यासोबत या संभाषणातील संदेशाला सेव्ह अथवा फॉरवर्ड करता येणार नाही. इतकेच नव्हे तर याचा फक्त आयओएस युजर स्क्रीनशॉट काढू शकेल. अर्थात समोरच्या युजरने स्क्रीनशॉट काढल्यानंतर त्याची माहिती संदेश पाठविणार्‍याला कळणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता सीआयएसारख्या गुप्तचर यंत्रणांनाही या चॅटींगमधील माहिती मिळविता येणार नसल्याचा दावा व्हायबरतर्फे करण्यात आला आहे.