वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रस्तावित राष्ट्रीय बहिर्गमन चाचणीला १२ राज्य आणि ४ केंद्रशासित प्रदेश अनुकूल

देशात वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रस्तावित राष्ट्रीय बहिर्गमन चाचणी – नॅशलन एक्झिट टेस्ट – नेक्स्ट वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बंधनकारक करण्यास १२ राज्य आणि ४ केंद्रशासित प्रदेशांनी अनुकूलता दर्शवली आहे.
यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. माहिती अधिकार कायद्यातर्गंत प्राप्त एका अर्जाच्या उत्तरात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. ही चाचणी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच फक्त डॉक्टर म्हणून मान्यता देण्याची तरतूद यामध्ये असून देशातल्या नऊ राज्यांनी मात्र याला विरोध केला आहे.

 

एका उच्चस्तरीय समितीनं सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ही चाचणी अनिवार्य करण्याची शिफारस केली होती. या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं भारतीय वैद्यकीय परीषद सुधारणा विधेयक २०१६ चा मसुदा तयार करून राज्यांच्या अनुकूलतेसाठी पाठवला होता, त्यावर राज्यांनी आपली मतं सरकारला कळवली आहेत